बंद

    प्रस्तावना

    राज्यात अनेक विभागांपासून भूजलाशयीन मच्छीमार यांचेकरीता स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ मत्स्यव्यवसाय विभागाअंतर्गत स्थापन करण्याची मागणी मच्छीमार सहकारी संस्था, मच्छीमार बांधव यांचेकडून करण्यात येत होती. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय क्षेत्राला वर्धित करण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना राबविल्या जातात. जसे की, निर्माण झालेल्या तलावामध्ये मत्स्यबीज संचयन, पिंजरा पद्धतीने मत्स्यसंचयन, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यबोटुकली संवर्धन इत्यादी. महाराष्ट्रातील सागरी तसेच भूजल मच्छीमारांची नोंदणी, परवाना वितरण, परवाना तपासणी, नुतनीकरण, निरीक्षण इत्यादी कामे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात येतात. तसेच सागरी मासेमारी नियमन कायदा 1981, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय कायदा 1960, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व इतर मत्स्यव्यवसाय संबंधित कायद्याची अमलबजावणी या विभागामार्फत करण्यात येते. तथापि मच्छीमार बांधव व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. यामुळे मच्छीमारांना विविध योजनांचा लाभ देणे, त्यांच्या कल्याणासाठी आणि जीवनमानाच्या विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाअंतर्गत महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.